‘सनातन प्रभात’ अॅपमध्ये महत्त्वपूर्ण पालट : ‘सर्च’ सुविधा उपलब्ध !
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर !
(सर्च म्हणजे शोधण्याची व्यवस्था)
मुंबई – ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाच्या अॅपमध्ये महत्त्वपूर्ण पालट करण्यात आले असून आता त्यामध्ये ‘सर्च’ सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अॅपद्वारे वाचकांना ‘सनातन प्रभात’च्या SanatanPrabhat.org या संकेतस्थळावरील कोणत्याही जुन्या बातम्या अथवा लेख शोधता येणार आहेत. यासमवेतच अॅपवर आता केवळ त्या दिवसाच्याच दैनिकातील मजकूर नाही, तर संपूर्ण संकेतस्थळावरील मजकुराचा लाभ वाचकांना घेता येणार आहे. अॅप आता अधिक आकर्षक रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाच्या तांत्रिक विभागाने दिली.
अॅपवरील अन्य महत्त्वपूर्ण सुविधा !
१. अॅपमध्ये ‘स्वाईप लेफ्ट-राईट’ सुविधाही देण्यात आली आहे. या माध्यमातून अॅपवर डावीकडून उजवीकडे अथवा उजवीकडून डावीकडे आपण बोटे फिरवल्यास अन्य बातम्या / लेख वाचता येतील.
२. अॅपवर ‘तेजस्वी विचार’, ‘आंतरराष्ट्रीय बातम्या’, ‘राष्ट्रीय बातम्या’, ‘महाराष्ट्र’, ‘गोवा’, ‘स्थानिक बातम्या’, ‘संपादकीय’, ‘राष्ट्र-धर्म लेख’, ‘आरोग्य आणि जीवनशैली’, ‘ज्योतिषशास्त्र’, ‘संशोधन’, ‘साधना’, ‘साधकांसाठी सूचना’, तसेच ‘आजचे दैनिक’ अशा प्रकारे विषयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
३. अॅपवर ‘भाषा निवडा’ या पर्यायावर क्लिक केल्यास आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी अथवा कन्नड भाषा निवडता येईल. यातून प्रतिदिन प्रसारित होणार्या या चारही भाषांतील बातम्या आपल्याला वाचता येणार आहेत. तसेच कन्नड आणि मराठी साप्ताहिक, तसेच हिंदी अन् इंग्रजी पाक्षिक यांतील मजकूरही वाचता येईल.
४. अॅपवरून ‘सनातन प्रभात’चा ई-पेपर, तसेच टेलीग्राम, ‘एक्स’, ‘यू ट्यूब’ या सामाजिक माध्यमांवरील ‘सनातन प्रभात’च्या अधिकृत खात्यांना भेट देता येईल.
५. लवकरच अॅपवर ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’चा एक वेगळा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘सनातन प्रभात’ अॅप कसे मिळवाल ?भ्रमणभाषावर ‘सनातन प्रभात अॅप’ ‘इन्स्टॉल्ड’ असल्यास : अॅन्डॉईड भ्रमणभाष असणार्या वाचकांनी ‘गूगल प्लेस्टोर’वर जाऊन सनातन प्रभात अॅप अपडेट (अद्ययावत्) करावे. अॅपल आयफोन असणार्या वाचकांनी ‘अॅपल स्टोअर’वर जाऊन सनातन प्रभातचे अॅप अद्ययावत करावे. |
भ्रमणभाषावर ‘सनातन प्रभात अॅप’ इन्स्टॉल कसे कराल ? : भ्रमणभाषावर अॅप इन्स्टॉल करण्यासाठी पुढील मार्गिकांवर जा
अन्ड्रॉईड : sanatanprabhat.org/android
आयफोन : sanatanprabhat.org/ios