तालिबान आणि पाक यांच्यातील युद्धात पाकचा १, तर तालिबानचे ७ सैनिक ठार
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानाच्या तालिबानी सैन्याकडून पाकच्या सीमेवर आक्रमणे चालूच आहेत. तालिबानच्या सैन्याने २८ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानच्या चौक्यांवर केलेल्या गोळीबारात पाकच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर ११ सैनिक घायाळ झाले. पाक सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात तालिबानचे ७ सैनिक ठार झाले. पाकिस्तानी वायूदलाने अफगाणिस्तानात केलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी तालिबानच्या सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर आक्रमण केले जात आहे. २ दिवसांपूर्वी तालिबानने केलेल्या आक्रमणात पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली होती. त्या वेळी पाकिस्तानचे १९ सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात आले होते.
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल देश एकमेकांच्या विरोधात लढून रक्तपात घडवून आणतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. तालिबान आणि पाक यांच्यात जे घडत आहे, त्यावरून हेच पुन्हा सिद्ध झाले आहे ! |