मराठा समाजातील मुलांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास २ महिन्यांची मुदतवाढ !
मुंबई – राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (‘ई.डब्ल्यू.एस्.’) प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ‘एस्.ई.बी.सी.’ जात प्रमाणपत्र सादर करण्यास २ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे प्रमाणपत्र सादर करणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सक्तीचे केले आहे. त्यामुळे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. २ महिन्यांत हे प्रमाणपत्र मिळणे अवघड आहे. त्यामुळे या वर्षी ‘ई.डब्ल्यू.एस्.’ अंतर्गत प्रवेश अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ई.डब्ल्यू.एस्.’ अंतर्गतच निश्चित करण्यात यावेत. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास अल्प होईल, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.