पुणे येथे नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन
पुणे – बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालनामध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी असणार आहे. इतिहास तज्ञ, गड आणि दुर्ग संवर्धन प्रेमी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंतिक श्रद्धाभाव असलेल्या प्रत्येकांनी प्रदर्शन अवश्य पहावे, असे जाहीर आवाहन विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांवर सध्याच्या काळातील मिलिटरी कमांडर्स कसा विचार करतात ? तानाजी मालुसरेंच्या यशस्वी नेतृत्वाखाली नियोजनाचे महत्त्व, प्रत्यक्ष लढाईत बदलत्या परिस्थितीत त्यांनी कसे निर्णय घेतले ? या ऐतिहासिक लढाईतील अनेक नवे पैलू समजून घेता येणार आहेत, असे विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी सांगितले आहे.