ब्रह्म अवतरले सगुण रूपात ।
‘वैशाख शुक्ल एकादशी, म्हणजे मोहिनी एकादशीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मला कविता सुचली. ती येथे दिली आहे.
ब्रह्म अवतरले सगुण रूपात ।
जयंत आठवले नाम तयास ।। ध्रु. ।।
सत्-चित्-आनंद प्रशांत योगी ।
रिद्धीसिद्धि धरी परि विरागी ।
वेदतुल्य ग्रंथांचे रचिते ।
ज्ञानामृत हे त्यांतूनी स्रवते ।। १ ।।
भूतलावरी धर्म रक्षिण्या ।
साधकांसी जगी उद्धरण्या ।
मुमुक्षु जिवा बोध देण्या ।
धर्माचा सन्मार्ग दाविण्या ।। २ ।।
सूक्ष्म सूक्ष्मतम् जगत् दाविले ।
कलेस ईश्वरी अधिष्ठान दिधले ।
प्रयोग नाना स्वये करविले ।
आचार सात्त्विक जनी रुजविले ।। ३ ।।
धन्य धन्य ते जीव जाहले ।
जयांस अद्भुत दर्शन घडले ।
कृपामृताने चिंब नाहले ।
जन्मांतरीचे सार्थक झाले ।। ४ ।।
– सौ. प्राजक्ता पुजार, फोंडा, गोवा. (१२.५.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |