अझरबैझानचे विमान पाडल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी क्षमा मागितली
मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अझरबैझानचे विमान पाडल्यावरून क्षमा मागितली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि घायाळ नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. २५ डिसेंबर या दिवशी अझरबैझान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ नियोजित मार्गावरून भटकले आणि कोसळले. यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानावर रशियाने आक्रमण करण्यात आल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता पुतिन यांनी याचे दायित्व घेत क्षमा मागितली. ते म्हणाले की, आम्ही युक्रेनचे ड्रोन आक्रमण परतवून लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी या विमानावर आक्रमण झाले.