चिंचोली औद्योगिक वसाहतीमधून (जिल्हा सोलापूर) ३ बांगलादेशी नागरिकांना अटक !
सोलापूर – मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत येथे काम करणार्या ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्वांवर परकीय नागरिक कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२६ डिसेंबरला सोलापूर येथील आतंकवादविरोधी पथकाला औद्योगिक वसाहत येथे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य आणि चाकरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आणि आतंकवादविरोधी पथक यांनी औद्योगिक वसाहतीत कामगारांना रहाण्यासाठी बांधलेल्या खोल्यांची पडताळणी केली. या वेळी चंचल विष्णु देव याला कह्यात घेतले. त्याच्याकडे भारतातील अधिकृत पुरावा नसून त्याने सोलापूर येथील दलालाकडून आधारकार्ड बनवून घेतल्याचे सांगितले. त्याच्या माहितीतून रजा हुजूरअली हुसेन (वय ३८ वर्षे) आणि साथीदार मीनल शनीचेरा टुडू (वय ३० वर्षे) हे बांगलादेशाचे असून तेही त्याच्यासारखेच अवैधरित्या रहात असल्याचे समोर आले.
तिघांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे किंवा पारपत्र नव्हते. सीमेवरील मुलकी अधिकार्यांची अनुमती घेतलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विरोधात गोपनीय विभागाचे वरिष्ठ हवालदार गोपाळ साखरे यांनी तक्रार दिली. अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.
अकोला येथून २ बांगलादेशींना अटक !
अकोला – येथील एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या परिसरात २ बांगलादेशी अनधिकृतरित्या वास्तव्य करत होते. आतंकवादविरोधी पथक आणि एम्.आय.डी.सी. पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत त्यांना अटक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनी शंकर निशिकांत बिश्वास (वय २७ वर्षे) आणि निर्मल उपाख्य नयन निशिकांत बिश्वास (वय २५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, कोविड कार्ड यांसह अन्य साहित्य जप्त केले आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांना भारतात अवैधरित्या राहू देणार्या सर्वत्रच्या दलालांना कारागृहात डांबायला हवे ! |