फोंडा, गोवा येथे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने अधिवक्ता कार्यशाळेचे आयोजन !
फोंडा, २८ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतील राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी अधिवक्त्यांसाठी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने ३ दिवसांच्या ‘अधिवक्ता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन २७ डिसेंबर या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथील ज्येष्ठ अधिवक्ता कृष्णास्वामी कणिवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या वेळी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी म्हणाले की, महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या बाजूने केलेला शिष्टाचार, प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात अफझलखानाला हरवण्यासाठी गोपीनाथपंत बोकील यांनी वठवलेली भूमिका, तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आदी राजकीय नेते हे अधिवक्ता होते. आजही आपल्या देशातील विविध समस्या, भ्रष्ट व्यवस्था या सर्वांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे होय. त्यासाठी अधिवक्त्यांनी योगदान देण्याची आवश्यक आहे.
या कार्यशाळेत, ‘खोट्या कथानकाला उत्तर कसे द्यावे ?’, ‘वक्फ बोर्ड : एक गंभीर समस्या आणि आणि त्यावरील भूमिका’, ‘हिंदुत्वाशी संबंधित समस्यांवर कशी कृती करावी ?’, ‘हिंदूसंघटन आणि हिंदुरक्षण यांसाठी कार्य करणार्यांना कायदेशीर साहाय्य करणे’, ‘अनुभव कथन’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले.