बिहारमध्ये मनुस्मृतीचे दहन, तर उत्तरप्रदेशामध्ये विद्यार्थ्यांकडून मनुस्मृति जाळण्याचा प्रयत्न !
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या सीतामढी येथे एका व्यक्तीने मनुस्मृतीचे दहन केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, सीतामढी पोलिसांच्या ‘एक्स’ खात्यावर माहिती मिळाली की, जय सराफ नावाची एक व्यक्ती मनुस्मृति जाळत आहे आणि सामाजिक माध्यमांवर घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच समाजात जातीय वातावरण बिघडू शकते. वरील माहितीची नोंद घेत पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
बनारस हिंदु विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मनुस्मृतीच्या दहनाचा प्रयत्न
उत्तरप्रदेशातील वाराणसीतील बनारस हिंदु विश्वविद्यालयातील काही विद्यार्थी येथील चौकात मनुस्मृतीचे दहन करणार होते. (ज्या विश्वविद्यालयाच्या नावात ‘हिंदु’ आहे, तेथील विद्यार्थी अशा प्रकारे हिंदुद्वेषी असणे लज्जास्पद ! – संपादक) ते येथे घोषणाबाजी करत होते. त्यांनी येथे मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांना अटक केली. यात ३ विद्यार्थिनींचाही समावेश आहे. हे सर्व जण या विश्वविद्यालयात विविध विषयांचे शिक्षण घेत आहेत. त्यांचा ‘भगतसिंह मोर्चा’ नावाच्या संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
संपादकीय भूमिकामनुस्मृति जाळून तिच्यातील विचार मरणार नाहीत, हे हिंदुद्वेष्ट्यांच्या लक्षात कधी येणार ? हिंदूंचा पवित्र ग्रंथ जाळून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक ! |