भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षाव्यवस्था तैनात !
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे. हे पथक सायबर गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. महाकुंभनगरीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘सायबर हेल्प डेस्क’ उभारण्यात आला असून सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. यासह विविध माध्यमांतून भाविकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकताही निर्माण करण्यात आली आहे. हे पथक बनावट संकेतस्थळांवर कठोर कारवाई करणार आहे. या पथकाकडून सध्या अशा प्रकारच्या ५० संकेतस्थळांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.