Maulana Shahabuddin Razvi On Mahakumbh : (म्हणे) ‘पवित्र कुंभमेळ्यात राजकारण करणार्‍यांवर आखाडा परिषद आणि राज्य सरकार यांनी आळा घालावा !’

बरेली (उत्तरप्रदेश) येथील मौलाना शहाबुद्दीन रझवी यांची कुंभमेळ्यात संतांकडून लावण्यात आलेल्या फलकांवरून मागणी

मौलाना शहाबुद्दीन रझवी

बरेली (उत्तरप्रदेश) – प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी अनेक संतांनी विविध होर्डिंग लावले आहेत. त्यात रत्नागिरी येथील नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनीही काही फलक लावले आहेत. यांतील एका फलकावर ‘सनातन सात्त्विक है, पर कायर नहीं’ (सनातन सात्त्विक आहे; पण घाबरट नाही), दुसर्‍या फलकावर ‘डरेंगे तो मरेंगे’ (घाबरलो, तर मरू), तर तिसर्‍या फलकावर ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है । धर्मनिरपेक्ष देश में ये कैसी छूट है ।’ (वक्फच्या नावावर संपत्तीची लूट चालली आहे. धर्मनिरपेक्ष देशात ही सूट कशी दिली जात आहे ?) असे वाक्य लिहिण्यात आले आहे. याला आता मुसलमानांकडून विरोध होऊ लागला आहे. मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी म्हटले की, कुंभमेळा धार्मिक पवित्र मेळा आहे, इथे राजकारण करणे या मेळ्याच्या पावित्र्याविरुद्ध असेल. असे कृत्य करणार्‍यांना आखाडा परिषद आणि सरकार यांनी आळा घालावा.

सनातन मंडळाला माझे समर्थन !

मौलाना पुढे म्हणाले की, असाहाय्य विधवांच्या साहाय्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. वक्फ बोर्डातील सर्व भूमी मुसलमानांना देण्यात आली आहे. एकाही हिंदूने बोर्डाला भूमी दिलेली नाही आणि या मंडळावर सरकारचे नियंत्रण आहे. तसेच अशा प्रकारे ‘सनातन मंडळाची (बोर्डाची) स्थापना झाल्यास त्याला माझा पाठिंबा आहे. मंदिरे आणि मठ यांंच्या भूमी अन् संपत्ती यांंवर लक्ष ठेवण्यासाठी सनातन मंडळाची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

संतांना फलकांद्वारे उठवलेली सूत्रे वस्तूस्थिती असून हिंदूंना जागृत करण्यासाठी आहेत. त्यामुळे रझवी यांच्या पोटात का दुखत आहे ? हिंदूंच्या धार्मिक उत्सवांत साधू-संतांच्या कार्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेणार्‍यांवरच सरकारने कारवाई केली पाहिजे !

हे वाचा → Prayagraj Mahakumbha Parva 2025 : ‘डरेंगे तो मरेंगे’ हा फलक ठरत आहे चर्चेचा विषय !

(म्हणे) ‘साधू-संत हिंदू-मुसलमान ऐक्याचे शत्रू !

मौलानांनी आरोप केला की, साधू-संत हिंदु-मुसलमान ऐक्याचे शत्रू बनले आहेत. त्यांना देशात हिंदू आणि मुसलमान यांच्या नावावर फूट पाडायची आहे, जे नक्कीच होणार नाही. अशा गोष्टी भडकावणार्‍या आणि समाजात फूट पाडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी माझी सरकारला विनंती आहे. (साधू-संत हिंदूंना धर्मनिरपेक्षतेच्या आत्मघाती ग्लानीतून जागे करत असल्याने धर्मांध मुसलमानांना त्रास होऊ लागल्याने ते त्याला विरोध करत आहेत. मुसलमानांना भारताची फाळणी करून २ देश आल्यानंतरही हिंदु-मुसलमान ऐक्य होऊ शकले नाही; कारण हे ऐक्य एकतर्फी होते, हे हिंदूंना आता कळायला लावले आहे ! – संपादक)