Moradabad Jain Temple : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४० वर्षांनंतर उघडले जाणार जैन मंदिर
मंदिराच्या जागेवर मुसलमानांचे अतिक्रमण
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील रतनपूर काला गावातील ४० वर्षे बंद असणारे जैन मंदिर आता प्रशासनाकडून उघडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अनुज कुमार सिंह यांनी सांगितले की, जैन समाजातील लोक मंदिराच्या मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले होते. यामुळे हे मंदिर रिकामे आहे आणि बंद पडले होते; परंतु मंदिराची जागा सामाजिक कार्यासाठी वापरण्याची विनंती करण्यात आली आहे. ज्यामुळे आता जैन समाजाच्या लोकांच्या इच्छेनुसार ग्रंथालय बांधले जाईल.
स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, या मंदिराच्या समोरील जागेवर दोन्ही बाजूंनी मुसलमानांंनी अतिक्रमण केले आहे. तेथे बेकायदेशीर दुकाने बांधण्यात आली आहेत. मुसलमानांनी आरोप फेटाळला आहे. जिल्हाधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.
मंदिर का बंद आहे ?पूर्वी जैन समाजाची कुटुंबे येथे रहात असत. हळूहळू प्रत्येकाने तेथून स्वतःची घरे विकली आणि निघून गेले; परंतु प्रदीप जैन यांच्या घरात मंदिर होते, त्यांनी घर विकण्याऐवजी ते बंद केले अन् तेथून स्थलांतरित झाले. त्यांनी मंदिरातील मूर्ती मुरादाबाद आणि हल्द्वानी येथील इतर मंदिरांमध्येही हालवल्या. तेव्हापासून मंदिर बंद आहे. मंदिराच्या आजूबाजूला मुसलमानांची लोकसंख्या आहे. हे मंदिर बंद राहिल्याने मुसलमानांनी तेथे कचरा फेकण्यास चालू केले. आता हे मंदिर सरकारकडे सोपवण्यात आले आहे. |