साधनेला आरंभ केल्‍यावर श्री. शिवाजी लक्ष्मण शिनगारे यांना आलेल्‍या अनुभूती

१. व्‍यवसायात अनेक अडचणी येणे आणि साधकांच्‍या तळमळीमुळे नामजप अन् साधना करू शकणे

‘मी एक व्‍यावसायिक आहे. मी पूर्वी व्‍यवसायात पुष्‍कळ कष्‍ट घेतले. त्‍या धावपळीच्‍या तुलनेत मला म्‍हणावे तितके यश प्राप्‍त झाले नाही. व्‍यवसाय म्‍हटल्‍यावर क्षणोक्षणी अनेक अडचणी येत असतात. या सर्व अडचणींवर मात करत पुढे जाण्‍यातच मी दिवसभर व्‍यस्‍त असे. मी साधकांच्‍या संपर्कात आल्‍यावर त्‍यांनी मला नामजप आणि साधना यांचे महत्त्व सांगितले. त्‍यांनी ते सर्व माझ्‍याकडून करूनही घेतले.

२. परमेश्‍वराच्‍या कृपेने संकटे दूर होऊन आनंदी जीवन जगता येणे

माझी नामजपाची साधना टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाढत गेली आणि माझा परमेश्‍वराविषयीचा भक्‍तीभाव जागृत झाला. मी माझ्‍या सर्व कामाचे दायित्‍व ईश्‍वरावर सोपवले आणि मी चिंतामुक्‍त अन् तणावमुक्‍त जीवन जगू लागलो. आता मी आनंदी आहे. माझ्‍या व्‍यवसायाचे दायित्‍व परमेश्‍वराने घेतले आहे. आताही अनेक संकटे येत असतात; पण परमेश्‍वराच्‍या कृपेने ती दूर होतात.’

– श्री. शिवाजी लक्ष्मण शिनगारे, तळंदगे, तालुका हातकणंगले, जिल्‍हा कोल्‍हापूर. (जुलै २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक