सांगली येथील जिज्ञासूंना सनातन संस्‍था आणि गुरुदेव यांच्‍या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती

१.  श्री. सुनील मारुति पाटील, सांगली

१ अ. गुरुदेवांनी हिंदु धर्म आणि देवता यांच्‍याविषयीची माहिती सोप्‍या भाषेत उपलब्‍ध करून दिलेली असणे आणि गुरुदेवांनी सांगितलेली अष्‍टांग साधना करून साधक आध्‍यात्मिक उन्‍नती करून घेत असणे : ‘काही जणांनी ‘हिंदु धर्म आणि धर्मज्ञान’ यांविषयी समाजात अपसमज निर्माण केले आहेत. ते लोक ‘विविध ग्रंथ, देवता आणि पंथ यांमध्‍ये एकवाक्‍यता नाही’, असे सांगतात. गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) सोप्‍या भाषेत सर्व ज्ञान सर्वांना उपलब्‍ध करून दिले आहे. त्‍यांनी सांगितलेली अष्‍टांग साधना (टीप) करून आपण अध्‍यात्‍मातील वरची पातळी गाठू शकतो. (टीप : अष्‍टांग साधना – १. स्‍वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्‍संग, ६. सत्‍सेवा, ७. सत्‌साठी त्‍याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम))

१ आ. शिक्षक म्‍हणून कार्यरत असतांना ‘ते काम ईश्‍वराची सेवा आहे’, या भावाने केल्‍याने आलेल्‍या अनुभूती

१. मी शिक्षक म्‍हणून कार्यरत असतांना ‘ते काम ईश्‍वराची सेवा आहे’, या भावाने करतो. मी सांगितलेला अभ्‍यास विद्यार्थी शांतपणे करतात. विद्यार्थी दिलेल्‍या स्‍वाध्‍यायापेक्षा अधिक अभ्‍यास करतात.

२. ते वर्ग स्‍वच्‍छ ठेवतात.

३. ते स्‍वतः नीटनेटके रहातात.

४. ते मोठ्या व्‍यक्‍तींशी नम्रतेने बोलतात.

५. ते अन्‍य मुलांपेक्षा अभ्‍यासात अधिक रमतात.

मी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

२. डॉ. विशाल संजय पाटील, पलूस, जिल्‍हा सांगली.

‘आम्‍ही २ वर्षांपूर्वी साधनेत आलो. या २ वर्षांत मला पुष्‍कळ पालट जाणवत आहे.

२ अ. साधना चालू करण्‍यापूर्वीची स्‍थिती

१. मी देवपूजा झाल्‍यानंतर नामजप करतो. मला आरंभीच्‍या काळात पुष्‍कळ त्रास झाला. मी नामजप करण्‍यासाठी बसल्‍यावर ‘नामजपात खंड पडणे, मन एकाग्र न होणे, मधेच मंत्रोच्‍चार थांबणे’, अशा अडचणी येत असत.

२ आ. साधना चालू केल्‍यानंतर : आम्‍ही साधना चालू करण्‍यापूर्वी ‘गाडीचा अपघात होणे, घरामध्‍ये तणावाचे वातावरण असणे आणि चिडचिड होणे’, यांसारखे त्रास होत असत.

१. मी साधना चालू केल्‍यापासून सर्व व्‍यवस्‍थितपणे चालू आहे. आता आमच्‍या घरात चैतन्‍यमय वातावरण निर्माण झाले आहे.

२. प्रत्‍येक कृतीला नामजपाची जोड दिल्‍यामुळे मला वेगळाच आनंद मिळतो.

‘गुरुदेवा, तुम्‍हीच आमच्‍याकडून धर्मकार्य करून घ्‍या’, अशी मी प्रार्थना करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक