राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्‌चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी !

‘सध्याच्या काळात सर्वांपर्यंत पोचण्याचे वेगवान साधन म्हणजे दृक्-श्राव्य (‘ऑडिओ व्हिजुअल्स्’) माध्यम ! या माध्यमातून समाजात ‘अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म’ यांविषयीच्या जागृतीचे कार्य सनातनच्या आश्रमांतून केले जाते. विविध विषयांवरील धर्मसत्संगांची निर्मिती करून समाजाला धर्मशिक्षण दिले जाते. यासोबतच भारतीय संस्कृती, विविध कला, उदा. गायन, वादन, नृत्य, भाषा इत्यादी विषयांचे महत्त्व पटवून देणारे वैज्ञानिक संशोधन करून त्यांचेही दृक्-श्राव्य माहितीपट बनवले जातात.

यासाठी ‘सोळा संस्कार, यज्ञयागादी विधी, धार्मिक कृत्ये, विविध कलांचे प्रस्तुतीकरण, कलाकारांच्या मुलाखती, संतांचा सन्मान आणि साधनाप्रवास’, अशा विविध विषयांवरील चित्रीकरण तयार असून ते संकलित होऊन समाजापर्यंत लवकर पोचणे आवश्यक आहे. दृक्-श्राव्य संकलन (‘व्हिडिओ एडिटिंग’) आणि तत्संबंधी सेवा, उदा. संहितालेखन, ध्वनीसंतुलन (‘ऑडिओ बॅलन्स’), चित्रांवर कलेच्या दृष्टीने (‘फोटोशॉप सॉफ्टवेअर’मध्ये) काम करणे  इत्यादी करू शकणार्‍या आश्रमातील साधकांची संख्या अपुरी पडत असल्याने हे कार्य गतीने होण्यासाठी जाणकारांची आवश्यकता आहे.

काही हितचिंतकांचा ‘व्हिडिओ एडिटिंग’ करणे, हा व्यवसाय असतो. व्यावसायिक व्यस्ततेमुळे त्यांना अन्य धर्मकार्य करण्यासाठी वेळ देता येत नाही. अशा वेळी त्यांना त्यांच्या उपलब्ध वेळेत ही सेवा करता येईल.

ज्या साधकांना या सेवांसंबंधी ज्ञान आहे आणि ही सेवा करण्याची आवड आहे त्यांनी, तसेच जे सेवा शिकून घेऊन घरी काही वेळ ती करू शकतात, अशांनीही जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा. जिल्हासेवकांनी त्यांची माहिती पुढील सारणीनुसार पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत (७०५८८८५६१०)

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.