म्हसळा (रायगड) येथे शाळेच्या वाहनातून गोमांस नेणारे २ धर्मांध अटकेत !
म्हसळा (रायगड) – येथे शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक करणार्या तिघांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोर्बा येथे रहाणारा डॉ. हुसेन याने गोवंशियांची कत्तल केली. निशाल अब्दुल गफुर पेणकर याने त्याच्या शाळेच्या वाहनातून त्या मांसाची वाहतूक केली. याविषयीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले. त्या वाहनात २५० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून वाहनासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :
|