राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान चालू करणार असल्याचे आश्वासन !

आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना (संग्रहित चित्र)

रायगड – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान पुन्हा चालू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यांनी २६ डिसेंबर या दिवशी पनवेल आणि खोपोली बसस्थानकांना भेट दिली.

ते म्हणाले,…

१. स्वच्छता हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे या सगळ्यांना भविष्यात प्राधान्य देण्यात येईल.

२. प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांच्यासाठी असलेली विश्रांतीगृहेसुद्धा स्वच्छ अन् नीटनेटकी असावीत, यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.

३. पनवेल – खोपोली, पनवेल – अलिबाग आणि पनवेल – कल्याण या मार्गांवर नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल.