पुणे येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणार्या धर्मांधाला अटक
पुणे – विद्यार्थी वाहतूक करणारा बसचालक कय्यूम पठाण याने मुलीशी अश्लील कृत्य केले. या प्रकरणी पीडित १५ वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. (शाळेशी संबंधित सर्वच कर्मचार्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रांची पडताळणी वेळेवर करणे आवश्यक आहे ! – संपादक)
पीडित मुलगी इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे. आरोपी पठाण शाळकरी विद्यार्थ्यांची मिनी बसमधून ने-आण करतो. बसमध्ये लहान मुलेही असतात. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी बस थांबवली. पीडित मुलीने मुलाला खाली उतरवले. ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती. त्या वेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. घाबरलेली मुलगी बसच्या मागील आसनावर बसली. ती घरी आल्यावर काहीच बोलली नाही; परंतु २ दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. त्या वेळी घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीमध्ये प्रथम ! |