Pakistan Arms Supply To North East : जातीय हिंसाचार वाढवण्यासाठी पाककडून शस्त्रास्त्रांचा ईशान्य भारतात पुरवठा !

अन्वेषण यंत्रणांकडून धाडी, अनेकांना अटक !

नवी देहली – ईशान्य भारतात जातीय हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. अन्वेषण यंत्रणांना यासंदर्भात नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पाकची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ तस्करीद्वारे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि बिहार या ५ राज्यांद्वारे ईशान्येडील राज्यांत पोचवत आहे. या गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला शस्त्र तस्कर या राज्यांत दडून बसल्याचे लक्षात आले असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या ५ संशयित अड्ड्यांवर धाडी घालण्यात आल्या. तेथून शस्त्रे, तसेच रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती.

१. पाकिस्तानातून उत्तर भारतातील विविध राज्यांतून आलेली शस्त्रास्त्रे बिहारच्या १२ जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी जमा केली जातात. यानंतर ती विकली जातात.

२. काही महिन्यांपूर्वी नागालँडमध्ये जप्त एके-४७ ही बिहारमधून विकल्या गेल्या होत्या.

३. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या तपासात बिहारमध्ये तस्करीचे काम करणार्‍या १२ जणांना अटक करण्यात आली.

४. काही दिवसांपूर्वी यंत्रणेने काश्मीरमध्ये एका ठिकाणी, पंजाब आणि हरियाणा येथे प्रत्येकी एक अन् बिहारमध्ये १२ ठिकाणी धाडी घालून शस्त्रांचा मोठा साठा आणि १३ लाख रुपये रोख जप्त केले होते.

५. मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवादी आणि मैतेई हिंदू यांमधील जातीय हिंसाचार वाढण्यात बिहारमधून तस्करीद्वारे पाठवलेल्या शस्त्रस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

संपादकीय भूमिका

‘जिहाद’च्या रूपाने भारताला कायमची झालेली डोकेदुखी नष्ट करण्यासाठी ही विचारसरणी प्रसृत करणार्‍या पाकिस्तानचा नायनाटच केला पाहिजे, हे आपण कधी लक्षात घेणार ?