भूमी बळकावण्याच्या प्रकरणांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला कळत नाही का ?
‘गोवा राज्यातील भूमी बळकावण्याच्या प्रकरणांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात अवैधपणे भूमी बळकावण्याच्या प्रकरणांत वाढ झाली होती. पोर्तुगीजकालीन कागदपत्रांमध्ये पालट करून भूमी बळकावण्याचे प्रकार चालू होते. त्यानंतर याविषयीच्या तक्रारींच्या अन्वेषणासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.’ (२४.१२.२०२४)