मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट करणार्यांवर गुन्हा नोंद !
महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई !
मुंबई – सामाजिक माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपकीर्तीकारक पोस्ट (लिखाण) आणि व्हिडिओ पोस्ट (प्रसारित) करणार्या १२ ‘प्रोफाईल’विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या जुन्या भाषणांमध्ये पालट करून ती सामाजिक माध्यमांवर पोस्ट करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित प्रोफाईल वापरकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याअंतर्गत ट्विटर (एक्स्), फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील १२ प्रोफाईल यांचा समावेश आहे. भारत भावला शिंदे, शुद्धोधन सहजराव, ‘नागपूर काँग्रेस सेवादल’, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवले, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कणकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, ‘द स्मार्ट २३० के’ आणि विष्णु भोतकर अशी नावे असणार्यांनी अपूर्ण अथवा पालट केलेला व्हिडिओ प्रोफाईलवर अपलोड केला आहे.
संपादकीय भूमिका :राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात पोस्ट करणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! |