अयोध्येतील सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ऐकू येणार ‘रामधून’ !
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ‘रामधून’ ऐकू येणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशाचे परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली. प्रयागराज येथील महाकुंभपर्वाच्या निमित्ताने उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासह बसगाड्यांमध्ये भक्तीसंगीतही लावण्यात येणार आहे. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी २०२४ या दिवशी झाला, तर प्रयागमध्ये महाकुंभपर्व जानेवारी २०२५ मध्ये चालू होणार आहे.