खा. शरद पवार यांच्याकडून स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले
कराड – स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. वर्ष १९९९ मध्ये स्व. भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते, तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले असते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अगोदर पासून ते काँग्रेसमध्ये होते. असे असूनही शरद पवार यांनी त्यांना बाजूला ठेवले. स्व. भोसले यांना बाजूला ठेवल्याने त्यांची मोठी हानी झाली. स्व. अभयसिंहराजे भोसले यांना पद मिळाले असते, तर सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न सुटले असते, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.