मंदिरातील घंटा चोरी प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक !
बारामती (जिल्हा पुणे) – सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातील पितळ धातूच्या समई आणि घंटा चोरणार्या एका अल्पवयीन मुलाला सुपे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ सहस्र ५०० रुपयांच्या ११ घंटा कह्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे, मोरगाव, तरडोली, खंडूखैरेवाडी, कार्हाटी, दंडवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी या गावांतील मंदिरातून घंटा चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या चोर्या एका अल्पवयीन मुलाने केल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला कह्यात घेतले. त्याने गावातील मारुति मंदिर, महादेव मंदिर, जानाई मंदिर, सावता माळी महाराज मंदिर, बाबीर मंदिरातील पितळी घंटा आणि समई चोरल्याची कबुली दिली आहे.
संपादकीय भूमिकाअल्पवयीन मुलांना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांच्यावर संस्कार नसल्याचा हा दुष्परिणाम ! |