सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !       

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ ही संकल्पना मांडली. त्यानुसार ते कलासेवेतील साधकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मूर्तीसेवेतील साधकांनी श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीची निर्मिती केली आहे. आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे.

त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे. जे साधक, हितचिंतक वा वाचक यांना अशा प्रकारच्या संगणकीय प्रणालींचे ज्ञान आहे आणि ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन साधकांना शिकवू शकतात. ज्यांना ही सेवा करण्याची आणि सात्त्विक कलाकृतींच्या निर्मितीत योगदान देण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना ही सेवा पूर्णवेळ आश्रमात राहून करण्याची इच्छा आहे, अशांनी त्यांची नावे, त्यांना उपलब्ध वेळ इत्यादींची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवावी.

संपर्क : श्री. अभिजित सावंत, भ्रमणभाष क्र. : ८७९३६७१७८

इ-मेल : Kalavibhag@gmail.com