तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर प्रयत्न करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कल्याणी गांगण !  

‘तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही सुश्री (कु.) कल्याणी गांगण हिची अभ्यासू वृत्ती किती होती, हे सर्वानी  या लेखातून शिकण्यासारखे आहे.’  –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले      

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.)  कल्याणी गांगण यांना झालेले तीव्र त्रास आणि त्यातही त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून केलेले प्रयत्न येथे आपण पहात आहोत. २५ डिसेंबरला आपण वर्ष २००३ ते २००७ पर्यन्त त्यांना झालेले त्रास पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/866724.html

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

३. जानेवारी २०२० 

३ इ. आत्मविश्वास न्यून होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे मी प्रसाद भांडारातील सेवा करू शकत नव्हते. त्यामुळे मला सात्त्विक वस्तू जतन करतात, त्या ठिकाणी सेवा करायला सांगितली. तेव्हा माझा ‘मी सेवा करू शकते’, हा आत्मविश्वास पुष्कळ न्यून झाला होता.

४.  मार्च २०२० 

४ अ. वाईट शक्तींच्या त्रासामुळे शारीरिक क्षमता असूनही साधना करू न शकणे : प्रत्यक्षात मार्च २०२० मध्ये ‘मला साधना जमेल का ?’, हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. तेव्हा मी विचार करायची, ‘मी साधनेविना जगू शकत नाही. काहीही झाले, तरी मला अखंड साधना करत रहायचे आहे.’ माझे मन वाईट शक्तींच्या नियंत्रणात गेले होते. त्यामुळे शारीरिक क्षमता असूनही मी साधना म्हणून काहीच करू शकत नव्हते.

४ आ. निराशा आल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर या स्थितीतून बाहेर काढतील’, असा विचार करून पुन्हा प्रयत्न करणे : साधनेत नवीन आले, तेव्हा ‘सांगितलेले साधनेचे प्रयत्न मी कृतीत आणीन. मी प्रत्येक कृती नामजपासह करीन’, असे ठरवले होते; परंतु तेव्हा संपतकाळ असल्यामुळे मला ते कृतीत आणणे जमत होते आणि आनंद मिळत होता. आता आपत्काळ आहे आणि त्यामध्ये मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे मला प्रयत्न करायला जमत नाही; म्हणून मला निराशा यायची. तेव्हा लगेच ‘परात्पर गुरु डॉक्टर मला या स्थितीतून बाहेर काढतील’, असा विचार करून मी पुन्हा प्रयत्न करत होते.

५. जुलै २०२० 

५ अ. मन निराश होऊन ‘साधना जमेल का ?’, असा विचार येणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘भाव वाढवायला पाहिजे’, असे सांगितल्यावर मी भावसत्संगाला जाऊ लागले. तेथे सांगितलेले प्रयत्न मी प्रतिदिन करत होते. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेला माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाल्यामुळे मन निराश होऊन ‘साधना जमेल का ?’, असा विचार येत होता. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले वाक्य सतत आठवून प्रयत्न करत होते.

५ आ. सूक्ष्मातील युद्धाचा स्तर वाढल्यामुळे वाईट शक्तींची आक्रमणेही वाढणे आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ होणे : वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस मला काहीच लक्षात येते नव्हते. मी पूर्ण बधीर झाले होते. असा त्रास आतापर्यंत मला कुठल्याच गुरुपौर्णिमेला झाला नाही. त्यानंतर  विविध देवतांच्या नामजपाचे प्रयोग (टीप १) करायला आरंभ झाला. माझ्या मनात सारखा एकच विचार येत होता ‘माझी अशी स्थिती का झाली आहे ?’ दोन दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे माझीही स्थिती थोडीफार अशी झाली आहे, तर तुझ्यावर आक्रमणे होणारच !’’ त्या वेळी ‘सूक्ष्मातील युद्धाचा सध्याचा स्तर किती भयानक आहे !’, हे माझ्या लक्षात आले. त्यामध्ये ‘माझा श्वास चालू आहे’, हेच महत्त्वाचे आहे. अनेक साधकांचा त्रास वाढल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सहा महिने सतत प्रयोग घेतल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींची शक्ती न्यून होऊन ‘मला पुनर्जन्म मिळाला आहे’, असे वाटले.

टीप १ – साधकांसाठी आध्यात्मिक लाभ व्हावेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर विविध देवतांच्या नामजपाचे उपाय (प्रयोग) घेत असत.

५ इ. नामजपाच्या प्रयोगाच्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण इथे आहे’, असा भाव ठेवणे, तरीही पुष्कळ वेळा त्रासात वाढ होणे आणि तरीही प्रयत्न न सोडणे : ‘ विविध देवतांच्या नामजपाचे प्रयोग म्हणजे सूक्ष्मातील युद्धच आहे. हा चित्रीकरण कक्ष म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनाने केलेल्या युद्धाचे ठिकाण आहे, म्हणजे कुरुक्षेत्र आहे. इथे धर्म आणि अधर्म यांमधील युद्ध चालू आहे’, हा विचार मनात ठेवून ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण इथे आहे’, असा भाव मी ठेवत असे. त्यामुळे ‘नामजपाच्या प्रयोगाला बसणे ही साधना आहे’, हा विचार मनात येऊ लागला. काही दिवसांनी नामजपाचा प्रयोग चालू असतांना मी अखंड त्या त्या देवतेला शरण जाऊन भावपूर्ण नामजप करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु पुष्कळ वेळा माझा त्रास वाढत होता, तरीही मी प्रयत्न सोडून दिले नाहीत.

 (क्रमश:)

– सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखाचा या पुढील भाग वाचण्या करीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/867371.html

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.