स्थिर, शांत आणि सेवेची तळमळ असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) वर्षा जबडे (वय ४१ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (२६.१२.२०२४) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) वर्षा जबडे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सुश्री (कु.) वर्षा जबडे

सुश्री (कु.) वर्षा जबडे यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्रीमती मीरा करी

१. स्थिर आणि शांत स्वभाव

‘मी सुश्री (कु.) वर्षा जबडे यांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेते. वर्षा मुळातच स्थिर आणि शांत आहेत. त्या कोणताही प्रसंग स्थिर आणि शांत राहून हाताळतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या बोलण्यात चढ-उतार नसतात.

२. अनासक्त

वर्षा यांना कोणत्याही प्रकारचे ऐहिक आकर्षण नाही. त्या पालट किंवा मनोरंजन म्हणून कुठेही फिरायला जात नाहीत.

३. त्या साधकांशी आवश्यक तेवढेच बोलतात.

४. नेतृत्वगुण

वर्षामध्ये उत्तम नेतृत्वगुण आहे. त्यांच्याकडे लढाऊ वृत्तीही आहे. त्या उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेऊन साधकांच्या अडचणी सोडवतात.

५. सेवेची तळमळ

त्या वर्षातून एकदा घरी जातात. त्या घरी असतांनाही त्यांची सेवा चालू असते. त्या पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या सेवेच्या संदर्भातील दायित्व चांगल्या रितीने पार पाडतात. त्या सेवेत येऊ शकणारे वाईट शक्तींचे अडथळे टाळण्यासाठी नामजपादी उपाय करतात.

६. व्यष्टी साधनेमुळे झालेले पालट

अ. वर्षा गांभीर्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे ‘त्यांची अंतर्मुखता वाढली आहे’, असे मला जाणवते.

आ. त्या चुका झाल्यावर क्षमा मागतात आणि प्रायश्चित्तही घेतात.

इ. त्या प्रतिदिन साधनेविषयी १ ध्येय घेऊन प्रयत्न करतात आणि त्याचा मला आढावा देतात.

ई. त्यांच्या चेहर्‍यावर मला तेज दिसते.

७. गुरु आणि संत यांच्या प्रती भाव

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे स्मरण झाल्यावर त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू दाटतात.

आ. वर्षा सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) संवाद साधतात आणि ते त्यांनी सूक्ष्मातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.

इ. वर्षा यांच्यामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य संत यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे.

‘वर्षा यांचे साधनेचे प्रयत्न वाढून त्यांची लवकर आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी मी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती मीरा करी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (२९.११.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.