Bharuch Rape Case : भरूच (गुजरात) येथे ७० वर्षीय वृद्धेवर आरोपीकडून कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा बलात्कार
भरूच (गुजरात) – येथे ३५ वर्षीय शैलेश राठोड नावाच्या आरोपीने कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यावर ७० वर्षीय वृद्ध महिलेवर पुन्हा बलात्कार केला. याच वृद्धेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याला १८ मासांपूर्वी अटक करण्यात आली होती. या बलात्काराची तक्रार न करण्याची धमकी त्याने दिली होती. शैलेश विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
११ वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी एका स्थलांतरित मजुराच्या ११ वर्षीय मुलीवरही बलात्कार झाल्याची घटना येथे घडली होती. या जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. आठवड्याभरापासून तिच्यावर उपचार चालू होता.
संपादकीय भूमिकाअशा गुन्हेगारांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा देणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते ! |