Delhi Police : देहलीमध्ये घुसखोरांना भारतीय ओळखपत्रे बनवून देणार्या ११ जणांच्या टोळीला अटक
नवी देहली – सध्या देहलीत बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर घुसखोरांची भारतीय ओळखपत्र बनवणार्या एका मोठ्या टोळीतील ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीत आधारकार्ड ऑपरेटर आणि तांत्रिक तज्ञ यांचाही समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत बनवलेली ओळखपत्रे आणि ती कोणाकडून बनवली याचेही अन्वेषण चालू आहे.
देहलीचे पोलीस उपायुक्त दक्षिण अंकित चौहान यांनी या कारवाईची माहिती देतांना सांगितले की, जंगलातून भारतात घुसलेले बांगलादेशी विविध मार्गांनी देहली गाठायचे आणि या टोळीला भेटायचे. या टोळीत आधार कार्ड केंद्र चालक, तांत्रिक तज्ञ आणि ओळखपत्राची माहिती असणारे लोक आहेत. ही टोळी या घुसखोरांचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर भारतीय कागदपत्रे सिद्ध करत असे. ही टोळी बनावट कागदपत्रे बनण्यासाठी संकेतस्थळांचा वापर करत होती. या कागदपत्रांच्या सहाय्याने घुसखोर देहलीच्या विविध भागांत स्थायिक होत असत. हे घुसखोर भंगार गोळा करण्यापासून कारखान्यात काम करण्यापर्यंत सर्वच कामात गुंतलेले आहेत. त्यांनी बनवलेल्या ओळखपत्रांचा वापर करून कोणता घुसखोर कुठे रहातो, याचेही अन्वेषण पोलीस करत आहेत. या टोळीशी संबंधित इतर लोकांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत किती बनावट कागदपत्रे सिद्ध केली आहेत, याचेही अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात पालट करणे आवश्यक आहे. अशा शिक्षेमुळेच इतरांवर वचक बसेल ! |