UP Bulandshahar Again Hindu Mandir : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात सापडले हिंदु मंदिर
वर्ष १९९० च्या दंगलीनंतर हिंदूंनी पलायन केल्यापासून बंद आहे मंदिर
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. गेल्या ३० वर्षांपासून ते बंद होते. हे मंदिर जाटव समाजाने बांधले होते. ते तिथे पूजा करत असत. वर्ष १९९० च्या दंगलीनंतर जाटव समाजाने हा परिसर सोडला आणि मंदिरही बंद झाले. या वेळी समाजातील एका कुटुंबाकडून मंदिरातील मूर्तींचे नदीत विसर्जन करण्यात आले.
A Hindu temple has been found in the Mu$!im-majority area of Bulandshahr (Uttar Pradesh).
The temple had been closed after the Hindus of the area fled during the 1990 riots#ReclaimOurRoots #Temple pic.twitter.com/jVy1SRMyKE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 25, 2024
१. खुर्ज शहराचे उपविभागीय अधिकारी दुर्गेश सिंह म्हणाले की, हे मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे. या जागेविषयी कोणत्याही समाजामध्ये वाद नाही. मंदिराच्या मूर्तींचे नदीत विसर्जन करण्यात आले असून या प्रकरणाचा अन्वेषण चालू आहेे.
२. मंदिराचा शोध लागल्यानंतर विश्व हिंदु परिषद आणि जाटव विकास मंच यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मंच आणि विहिंप यांच्या सदस्यांनी मिळून मंदिरात धार्मिक उपक्रम पुन्हा चालू करण्याची मागणी केली आहे.
३. विहिंपचे मेरठ राज्य पदाधिकारी सुनील सोलंकी यांनी सांगितले की, मंदिर वर्ष १९९० पासून बंद आहे. त्या वेळी या भागात रहाणारी हिंदु कुटुंबे दंगलीच्या भीतीने पळून गेली होती. त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याची विनंती केली, जेणेकरून पूजा पुन्हा प्रारंभ होईल.
४. जाटव विकास मंचचे अध्यक्ष कैलास भागमल गौतम यांनीही मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकला. हे मंदिर जाटव समाजाच्या लोकांनी बांधल्याचे त्यांनी सांगितले.
या मंदिराविषयी स्थानिक लोकांच्या आणि संस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार करून पूजा पुन्हा प्रारंभ करता येईल, असे त्यांचे मत आहे. याविषयी प्रशासनाने लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे.