Amethi Muslims Occupied ShivaTemple : अमेठीमध्ये मुसलमानबहुल भागात २० वर्षांपासून मुसलमानांकडून शिवमंदिरावर नियंत्रण

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चालू केली चौकशी !

अमेठीतील पंचशिखर शिवमंदिर

अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठी जिल्ह्यात मुसलमानबहुल औरंगाबाद येथील १२० वर्षे जुन्या मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवल्याची घटना समोर आली आहे. हे पंचशिखर शिवमंदिर जेठुराम नावाच्या व्यक्तीने बांधले होते, जे गेल्या २० वर्षांपासून काही मुसलमानांच्या कह्यात होते. तेव्हापासून येथे पूजा बंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून प्रशासनाने चौकशी चालू केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याची चौकशी स्थानिक तहसीलदारांकडे सोपवली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या मंदिराची देखभाल पुजारी गणेश तिवारी आणि त्यांचे कुटुंबीय करत होते; पण सुमारे २ दशकांपूर्वी त्यांना स्थलांतर करावे लागले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशामध्ये आता प्रशासनानेच सर्वच मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिर शोधण्याची मोहीम राबवून ती मुक्त करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन संपूर्ण देशात ही मोहीम चालू केली पाहिजे !