Indore Saints On Road Against WaqfBoard : इंदूर (मध्यप्रदेश) येथे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

मंचावर उपस्थित संत-महंत

इंदूर (मध्यप्रदेश) – वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले. या वेळी वक्फ बोर्ड पूर्णपणे विसर्जित करण्याची मागणी करणारे एक निवेदन पंतप्रधानांच्या नावे देण्यात आले.

१. मंदिराची भूमी असो, सरकारी भूमी असो किंवा कुणाची खाजगी मालमत्ता असो, सर्वत्र वक्फ बोर्डाच्या नावाने मुसलमान कट्टरपंथियांनी अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे.

२. तत्कालीन काँग्रेस सरकारने कायदा करून वक्फ बोर्डाला ज्या प्रकारचे अधिकार दिले आहेत, ते भारतीय राज्यघटनेच्याही विरोधात आहेत.

३. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अवाजवी अधिकार दिले आहेत, जे आता देशासाठी घातक ठरत आहेत.

आंदोलनातं उपस्थित हिंदुत्ववादी

४. भारतातील वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानपेक्षा अधिक भूमी आहे.

५. देशातील अनेक मुसलमान कट्टरतावादी वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलनाच्या नावाखाली केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ठिकठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्नात आहेत.

६. हा वक्फ बोर्ड भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, म्हणून आपण केंद्र सरकारकडे मागणी करतो की वक्फ बोर्ड पूर्णपणे विसर्जित करण्यात यावे.

७. या आंदोलनात संत श्री कालीपुत्र कालीचरण महाराज (पुणे), हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सिंह ठाकूर, महामंडलेश्‍वर श्री श्री १०८ भरतदास महाराज, श्री श्री १०८ महामंडलेश्‍वर दिनेश दास महाराज, महामंडलेश्‍वर विजय रामदास बेटमा, श्री. महंत रुक्मणी देवी , महंत राजनाथ योगी, गणेशदास राजगुरु, बाल मुकुंद पराशर (मुख्य पुजारी गोपाल मंदिर), महंत तुलसी राम (नवग्रह शनि मंदिर कानडीया), मध्य भारतीय आर्य समाज प्रतिनिधी सभेचे प्रमुख प्रकाश आर्य , उज्ज्वल स्वामी, महंत राम गोपाल दास, महंत कृष्ण दास यांच्यासह सहस्रावधी हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंना जाचक ठरणार्‍या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !