राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन अपरिहार्य !
भारत हा प्राचीन काळी समृद्ध आणि संपन्न देश होता. तेथील लोक आनंदी आणि समाधानी होते. तेथे लौकिक आणि पारलौकिक विद्या, तसेच कला प्रवाहित होत्या. याचे कारण प्राचीन काळी देवालये ही खर्या अर्थाने सनातन धर्माची आधारशिला होती. सनातन धर्मातील ज्ञानाचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन करण्याचे कार्य देवालयांच्या माध्यमातून केले जात होते. त्यातून धर्मपरायण, राष्ट्रनिष्ठ, विद्वान आणि तेजस्वी पिढी निर्माण होत होती. थोडक्यात मंदिर संस्कृतीच्या संवर्धनात केवळ व्यक्तीचा आध्यात्मिक विकास नाही, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास सामावलेला आहे. दुर्दैवाने सध्याच्या काळात मात्र मंदिरांचा वैभवशाली वारसा क्षीण झाला आहे. मंदिरांच्या माध्यमातून देवाची भक्ती होतांना दिसत आहे; पण राष्ट्रभक्ती आणि धर्मशक्ती यांच्या निर्मितीचे कार्य होतांना दिसत नाही. राममंदिर झाले, पण अद्याप रामराज्य यायचे आहे. त्यामुळे भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (२४.१२.२०२४)