बँकेच्या परीक्षेदरम्यान सर्व्हर बंद पडल्याने गोंधळ !
विद्यार्थी आक्रमक झाल्याने परीक्षा रहित !
पुणे – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक आणि ९७ शिपाई पदांसाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार होती. यासाठी ३१ सहस्र उमेदवारांनी अर्ज केले होते; मात्र परीक्षेच्या पहिल्या दिवशी सर्व्हर बंद झाल्याने परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने परीक्षा रहित केली. राज्यातील ४० केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. यामध्ये पुणे येथील काही केंद्रांचाही समावेश होता. देहलीतील ‘डी.सी.एस्. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे, असे नंतर समोर आले. चंद्रपूर जिल्हा बँकेची भरती असल्याने या परीक्षेचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातच हवे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती.