वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री
सप्तश्रृंगीदेवीच्या गडावर ‘वक्फ’चा दावा !
नाशिक – ‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यामुळे आपण जागरूक होऊन वावरलो नाही, तर उद्या आपल्याला हे लोक घरातील पूजाही करू देणार नाहीत. त्यांचा (धर्मांधांचा) वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा प्रयत्न असून त्याचे सर्वांत मोठे हत्यार धर्मांतर हे आहे. त्यांना हिंदूंची लोकसंख्या अल्प करायची आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणून आपण जागरूक रहायला हवे, अशी चेतावणी मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री श्री. नीतेश राणे यांनी येथे दिली. येथील श्रीक्षेत्र चिराई येथे २४ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री श्री. नीतेश राणे म्हणाले की,
१. हिंदु धर्म पुष्कळ विशाल आहे. त्यात कुणावरही बळजोरी केली जात नाही. ‘आमचाच धर्म स्वीकारा, आमचा धर्म न स्वीकारल्यास तुला जिवंत ठेवणार नाही’, असे बोलण्याची आपल्यात प्रथा नाही.
२. आज धर्मांतरासारखी असंख्य आव्हाने हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहात आहेत. हिंदु समाजाची लोकसंख्या अल्प करून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे काम आपल्या डोळ्यांपुढे होत आहे. त्यामुळे कुणी आपल्या धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहात असेल, तर त्याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याची सिद्धता प्रत्येकाची असली पाहिजे.
३. जोपर्यंत आपल्यात तो कडवटपणा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्यांची संख्या अल्प होणार नाही.
४. एकीकडे हिंदु धर्मामध्ये सर्वांना समवेत घेऊन वाटचाल करण्यास शिकवले जाते, तर दुसरीकडे हिंदूंची लोकसंख्या अल्प करण्याचे मोठे कारस्थान रचले जात आहे.
५. ५७ मुसलमान देशांपैकी एकाही देशात ‘वक्फ बोर्डा’सारखा कायदा नाही. हा कायदा केवळ हिंदु राष्ट्र असणार्या आपल्या भारतातच अस्तित्वात आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचे भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! |