Online Fraud : हॉटेल, धर्मशाळा आदींचे ऑनलाईन आरक्षण करतांना फसवणूक टाळण्यासाठी सावधानता बाळगा ! – पोलिसांचे आवाहन
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वासाठी देश-विदेशातील भाविक येणार आहेत. यासाठी हॉटेल, धर्मशाळा किंवा टेंट (अद्ययावत तंबू) येथे रहाण्यासाठी भाविक ऑनलाईन आरक्षण करत आहेत. तथापि बनावट संकेतस्थळांद्वारे हॉटेल, धर्मशाळा आदींच्या नावाने आरक्षण करून भाविकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे हॉटेल, धर्मशाळा आदींचे ऑनलाईन आरक्षण करतांना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी अशा ५४ बनावट संकेतस्थळांवर कारवाई करून ती बंद केली आहेत.