Vande Bharat Express : ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ पनवेलऐवजी कल्याणच्या दिशेने गेली !

  • तांत्रिक बिघाडाचा परिणाम

  • नियोजित वेळेक्षा दीड घंटा विलंब

मुंबई – मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मडगावपर्यंत जाणारे ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ दिवा रेल्वेस्थानकावरून पनवेलला न जाता कल्याणच्या दिशेने पुढे गेली. चूक लक्षात आल्यावर तिला कल्याण रेल्वेस्थानकात आणण्यात आले. त्यानंतर पुढे काही वेळाने ती गोव्याच्या दिशेने रवाना झाली. रस्ता चुकल्यामुळे रेल्वेला मडगाव स्थानकात पोचण्यासाठी ९० मिनिटे विलंब झाला. ही घटना सकाळी ६.१० वाजता घडली. हा सर्व प्रकार सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला. या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईच्या मध्य रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाली. याचा फटका नोकरीला जाणार्‍या प्रवाशांना बसला.