Khalistani Terrorist Arrested In Mumbai : मुंबईतून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक
अमृतसर (पंजाब) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबईतून जतिंदर सिंह उपाख्य ज्योती या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक केली आहे. तो खलिस्तानी आतंकवादी लखबीर सिंह उपाख्य लांडा आणि गुंड बचितरसिंह उपाख्य पवित्रा बटाला यांचा साथीदार आहे. जुलै २०२४ मध्ये शस्त्रास्त्र तस्कर बलजीत सिंह उपाख्य राणा भाई याला अटक केल्यानंतर जतिंदर पसार झाला होता. जतिंदर खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या लांडाने स्थापन केलेल्या परदेशातील आतंकवादी टोळीचा सदस्य आणि बटालाचा एक सहकारी आहे, जो लांडाचा जवळचा सहकारी आहे. जतिंदरने मध्यप्रदेशातून १० पिस्तुले आणून पंजाबच्या लांडा आणि बटाला येथील आतंकवाद्यांना दिल्याचेही तपासात समोर आले आहे.