Bhopal Muslims Attack Sikhs : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिखांवर आक्रमण

६ जण घायाळ

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील मुसलमानबहुल जहांगीराबाद भागातील जुन्या गल्ला मंडीमध्ये धर्मांध मुसलमानांनी शिखांवर आक्रमण केले. यात ६ जण घायाळ झाले. या वेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली, तर मुसलमानांच्या हातात तलवारी दिसून आल्या. ते तलवारी, काठ्या घेऊन फिरत होते. त्यांनी एका महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. जहांगीराबाद पोलीस ठाण्याचे प्रमुख आशिष उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार २ दिवसांपूर्वी काही शीख आणि मुसलमान तरुणांमध्ये भांडण झाले होते. २४ डिसेंबरला सकाळी याच सूत्रावरून धर्मांध मुसलमान गोळा झाले आणि त्यांनी शिखांच्या घरांवर दगडफेक चालू केली.

२. पोलीस उपायुक्त प्रियांका शुक्ला यांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी वेगात दुचाकी चालवण्यावरून वाद चालू झाला होता. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांपैकी तिघांना अटक करण्यात आली, तर दोघे पसार झाले. या पसार आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. पोलीस आधीच घटनास्थळी उपस्थित होते; मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. व्हिडिओमध्ये काही लोक शस्त्रांसह दिसत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. या घटनेत कोणीही गंभीररित्या घायाळ झाले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवादी याविषयी काही बोलतील का ?