यवतमाळमधील कै. शंकर गो. पांडे यांनी हिंदु समाजाला दिलेला संदेश प्रत्येक हिंदूने कृतीत आणावा, हीच खरी श्रद्धांजली !
कै. शंकर गो. पांडे यांना दिलेल्या विनम्र श्रद्धांजलीची बातमी नुकतीच वाचली. काही मासांपूर्वी त्यांनी लिहिलेला ‘मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश’ हा लेख वाचनात आला. लेखाच्या शेवटी त्यांनी ‘भारतातील हिंदु, बौद्ध, शीख आणि जैन या सर्व लोकसमुदायांना स्वतःच्या देशाचे इस्लामीकरण कदापि न होण्यासाठी आणि या देशातील हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी अन् स्वसंरक्षणासाठी प्रतिकाराची लढाई लढण्यास आवश्यक असणार्या साधनसामुग्रीने सज्ज व्हावे’, असा जो मोलाचा संदेश दिला आहे, तो प्रत्येक हिंदूंने कृतीत आणावा.
आद्यशंकराचार्य, श्रीराम, श्रीकृष्ण जन्मभूमी, स्वामी विवेकानंद, हुतात्मा भगतसिंह अाणि त्यांच्या समान अगणित हुतात्मा क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, आझाद हिंद सेनानी सुभाषचंद्र बोस अन् लोकमान्य टिळक यांच्यासारखे अनेक झुंजार राष्ट्रपुरुष, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आणि समस्त संत या देशात शांतता नांदली आहे. अशा या देशातील हिंदूंनी निर्भयपणे लढावे आणि लॅबेनॉन, तालिबानप्रमाणे भारत देशाचे इस्लामीकरण कदापि होऊ देऊ नये. जगात सर्वश्रेष्ठ असणारा सनातन धर्म आणि उच्चतम आदर्शवत्, प्राचीन ऋषिमुनींनी दिलेला श्रेष्ठतम वैदिक हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे संरक्षण करण्याचे ध्येय स्वतःला ‘हिंदु’ म्हणवणार्या प्रत्येक भारतियाने स्वतःच्या उराशी बाळगावे. कै. शंकर पांडे यांच्या संदेशाचे पालन करावे आणि या प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखकाला विनम्र श्रद्धांजली द्यावी.
कै. शंकर पांडे आणि माझा परस्पर दीर्घ सहवास, पुसद (यवतमाळ) येथील त्यांच्या रहात्या वाड्यात शालेय जीवनापासून झालेला आहे. त्यांच्या अशा अनपेक्षितपणे कायमचे जाण्याने माझे अंतःकरण व्यथित आहे. कै. शंकर गो. पांडे हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक होते. समाजाच्या प्रबोधनासाठी त्याच्यासमान लेखकांची हिंदु समाजाला नितांत आवश्यकता आहे. श्रेष्ठ कवीवर्य ग.दि.माडगूळकर यांचे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे बोलच मनाच्या सांत्वनाला आधारभूत वाटतात. माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबियांची कै. शंकर पांडे यांना विनम्र श्रद्धांजली ! सर्वशक्तीमान परमेश्वर, महादेव, त्यांच्या घराण्याचे कुलदैवत आणि सर्व देवता यांनी दिवंगत कै. शंकर पांडे यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो, ही परमेश्वराला विनम्र प्रार्थना !
– अधिवक्ता प्रकाश उपाख्य अंबादास श्रीराम देशपांडे, रावेत, पुणे.