शिर्डीतील पुणतांबा येथे महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना !

संतप्त ग्रामस्थांकडून ‘पुणतांबा बंद’ची हाक  

ग्रामस्थांकडून रस्ता बंद आंदोलन

शिर्डी – येथील पुणतांबा गावात महादेव मंदिरात अज्ञाताने मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली आहे. मागील पंधरवड्यात मारुतीच्या मंदिरातही मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. (त्याच वेळी मूर्तीची विटंबना करणार्‍यांचा शोध घेतला असता, तर महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना रोखता आली असती ! – संपादक) आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांकडून रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. ‘पुणतांबा बंद’ची हाकही देण्यात आली आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची विटंबना, मंदिरांमध्ये चोर्‍या होणे आदी वाढते प्रकार पोलिसांच्या निष्क्रीयतेचे लक्षण !