सत्त्वगुणाचे कार्य
सत्त्वगुणाचे मुख्य लक्षण ‘प्रकाशक असणे’, असे आहे. दिसणे, कळणे, उमजणे, यथार्थ ज्ञान होणे, हे सर्व सत्त्वाच्या प्रकाशकतेमुळेच घडत असते. असा हा सत्त्वगुण ज्याच्या ठिकाणी आहे किंवा सत्त्वगुणांत योग्य रितीने रहातो, तो सत्त्वसमाविष्ट. सत्त्वसमाविष्ट पुरुषाचे इंद्रियांवर नियंत्रण असते. अंतःकरण शुद्ध असते. बुद्धी योग्य निर्णय घेते आणि त्यामुळेच काय ?, किती ?, कुठे ?, कसे ? आणि केव्हा ? करावे, हेही त्यास योग्य रितीने जाणता येते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथ)