SC Advocate J. Saidipak : भारतात ज्या मंदिरांवर मशिदी बांधण्यात आल्या तेथे परत मंदिरे उभारू !

सर्वोच्च न्यायालयातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता जे. साईदीपक यांचे विधान

अधिवक्ता जे. साईदीपक

नवी देहली – आम्ही हिंदूंच्या मंदिरांवर बांधण्यात आलेल्या शक्य तितक्या मशिदी हटवून आणि तेथे पुन्हा मंदिरे बांधू. आम्ही भारतातील प्रत्येक हिंदु मंदिर परत घेऊ. आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान सर्वोच्च न्यायालयातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. ‘मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधणार का ? किती मंदिरे बांधणार ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात ते बोलत होते.

अधिवक्ता जे. साईदीपक पुढे म्हणाले की,

१. धर्मनिरपेक्ष चौकटीने केवळ हिंदू संस्थाच नष्ट केल्या नाहीत, तर देशाला त्याच्या सांस्कृतिक वारशापासून दूर केले, एक सांस्कृतिक फूट निर्माण केली जी आजही कायम आहे.

२. मशिदीच्या नावावर झालेल्या हिंसाचारावर अधिवक्ता साईदीपक म्हणाले की, तुम्ही न्यायालयात उत्तर द्या, तुम्ही आम्हाला न्यायालयात चुकीचे सिद्ध करा. पुराव्यांनिशी उत्तरे द्या. आम्ही पुरावा सादर केल्यावर त्याच्या प्रत्युत्तरात तलवारी का उपसल्या जात आहेत ?