विविध घटकांतील शिष्यवृत्तीसाठी ४३ सहस्र ११७ अर्ज प्राप्त !
अर्जांची छाननी चालू !
नवी मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासह अन्य घटकांतील विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये १५ डिसेंबरपर्यंत ४३ सहस्र ११७ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
शिष्यवृत्ती योजनेसाठीअर्ज दाखल करण्याची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत होती. पालकांच्या विनंतीनंतर ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. सध्या या अर्जांची छाननी चालू आहे. यामध्ये त्रुटी असलेले अर्ज पुन्हा दुरुस्तीसाठी पाठवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी हे अर्ज त्वरित दुरुस्ती करून पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे.