अमूल्य जीवन मूल्यवान करूया ! – जैन मुनी श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज
पिंपरी (जिल्हा पुणे) – सध्या चंगळवादाकडे चाललेला समाज पहाता वाटते की, आपल्याला मिळालेले जीवन अमूल्य आहे. ते मूल्यवान कसे करता येईल ? हे पहायला हवे. आजपर्यंत आपण काय कार्य केले ? आणि त्यातील किती व्यर्थ गेले ? हे आत्मपरीक्षणातून पहाता येईल, असे मत जैन मुनी श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज यांनी व्यक्त केले. ‘भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर’ आणि ‘श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट प्राधिकरण’ यांच्या वतीने आयोजित ‘पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निगडी प्राधिकरण येथे हा महोत्सव घेण्यात आला. महोत्सवात विविध प्रकारे दान करणार्या व्यक्तींचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वेळी उपस्थित श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज म्हणाले की, गेले ५ दिवस केलेला पंचकल्याणक कार्यक्रम हा तीर्थंकरांसाठी नसून तो आपल्यासाठी आहे. नकारात्मक विचार डोक्यातून घालवण्यासाठी गुरुवाणी ऐकली पाहिजे, आचरणात आली पाहिजे, तरच जीवन सार्थकी लागेल. जीवनात आपण धर्मापेक्षा संसाराची चर्चा अधिक करतो.