समजावण्यापेक्षा समजून घेण्याने साधना होते ।
समजावतांना अनुभवाचा अभिमान असतो ।
समजावतांना ‘शिकण्या’पेक्षा ‘शिकवणे’ होत असते ।।
समजावतांना ‘मलाच समजून घ्यावे’, अशी ‘अपेक्षा’ असते ।
समजावतांना ‘मला अधिक कळते’, असा अहंभाव असतो ।। १ ।।
समजून घेण्याने ‘पूर्वग्रह’ नष्ट होतो ।
समजून घेण्याने ‘स्वेच्छा’ अल्प होते ।।
समजून घेण्याने ‘प्रीती’चा झरा वहातोे ।
समजावण्यापेक्षा समजून घेण्याने साधना होते ।। २ ।।
– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.