समष्टीचा विचार करून ज्ञान संपादन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष १९८६ मध्ये अध्यात्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाल्यावर मला माझे प्रश्न विविध संतांना विचारावे लागत होते. कालांतराने गुरुकृपेमुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातून मिळू लागली. सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान इतरांनाही अभ्यासण्यासाठी मिळावे, यासाठी ते ग्रंथाच्या स्वरूपात प्रकाशित करू लागलो. त्या वेळी ग्रंथातील विषय पूर्ण होण्यासाठी किंवा त्याचे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी इतर लेखकांचे ग्रंथ वाचून त्यातील आवश्यक ते लिखाण माझ्या ग्रंथांत घेऊ लागलो.

त्या वेळी लक्षात आले की, ‘सर्वसामान्य साधकाला त्याच्या आवडीच्या विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागतात. हे ज्ञान एकत्रित अभ्यासण्यासाठी मिळेल, अशी सोय कुठेच नाही.’

‘अध्यात्मातील एखाद्या विषयाच्या संदर्भातील विविध अधिकारी व्यक्तींचे लिखाणाचे सार एकाच ग्रंथात वाचायला मिळावे’, या ध्येयाने मी गेली ३५ वर्षे विविध ग्रंथ वाचून त्यांतील आवश्यक ते लिखाण गोळा करून ते विषयांनुसार विभागून ठेवत आहे. आता या संग्रहाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या संदर्भातील ग्रंथ प्रकाशित करणे चालू केले आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गाने साधना करणारा साधक असला, तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे ज्ञान सनातनच्या त्या विषयाच्या ग्रंथात मिळण्याची सोय होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.