Bangladeshi Infiltrators Arrested : धुळे, नवी मुंबई आणि भिवंडी येथून बांगलादेशी घुसखोरांना अटक
बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र !
पनवेल – महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई, धुळे आणि भिवंडी येथून देशात बेकायदेशीरित्या रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.
१. नवी मुंबईच्या कोपरा गावातील भाड्याच्या खोलीत रहाणार्या ४ बांगलादेशी महिलांना नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी कह्यात घेतले. खारघर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गावातील संजय ठाकूर यांच्या खोलीमध्ये भाड्याने हे बांगलादेशी रहात होते. (कोणतीही कागदपत्रे न पडताळतांना अशांना भाडेकरू ठेवणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्यास प्रारंभ झाल्यावर लोकांमध्ये याचा वचक बसेल ! – संपादक) अमिषा कमाल काजी (वय ३७ वर्षे), शर्मिन कमाल काजी (वय १८ वर्षे), राणी किमारूल शेख (वय ४० वर्षे) आणि सैफ्फुला अहमद अली खान (वय २७ वर्षे) अशी त्यांची नावे आहे. या महिला आणि तरुणी खारघर परिसरात घरकाम करत होत्या. (अशांना घरकामासाठी ठेवणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे, तरच देशात अशा घुसखोरांना भारत धर्मशाळा नाही, हे लक्षात येईल ! – संपादक)
२. धुळे येथील ‘हॉटेल न्यू शेरे पंजाब’ येथून ४ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. ब्लँकेट विकण्याच्या निमित्ताने ते येथे आले होते. महंमद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम महंमद बेताब शेख, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० सहस्र रुपये किमतीचे ४ भ्रमणभाष संच जप्त केले. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही पारपत्र आढळले नाही. ते नातेवाइकांशी बोलण्यासाठी ‘इन माय ओपिनियन’ (आय.एम्.ओ.’) हे अॅप वापरत होते.
३. भिवंडी येथे पोलिसांनी ८ बांगलादेशींना अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. सुबुज शेख, हैदर शेख, जमाल शेख, महंमद मोरशेद शेख, रफिक शेख, महमूदूल शेख, अन्सार चौधरी यांसह ३३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. या भागात वास्तव्य करून ते गवंडीकाम आणि नळ दुरुस्तीची कामे करत होते.
(आपल्याकडे काम करण्यासाठी येणारे कोण आहेत, याची माहिती न घेणारे भारतीयच घुसखोरांना पोसण्याचे काम करत आहेत. हे जेव्हा थांबेल, तेव्हाच अशांना भारतात न येण्याची बुद्धी होईल ! – संपादक) त्यांनी अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले.
संपादकीय भूमिकाअटक केलेल्या बांगलादेशींवर खटला चालवून त्यांना पोसण्यापेक्षा तात्काळ बांगलादेशात हाकलून दिले पाहिजे ! |