सर्वांत जुन्या असलेल्या श्री पंच दशनम आवाहन आखाड्याचा कुंभक्षेत्री प्रवेश
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – येथील त्रिवेणी संगम तटावर होणार्या महाकुंभपर्वासाठी विविध आखाड्यांचा कुंभनगरीत प्रवेश होत आहे. सनातन धर्माच्या १३ आखाड्यांपैकी सर्वांत जुन्या असलेल्या श्री पंच दशनम आवाहन आखाड्याने आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरि यांच्या नेतृत्वाखाली २२ डिसेंबरला मिवरणुकीद्वारे कुंभक्षेत्री प्रवेश केला. मडुका येथील आवाहन आखाड्याच्या स्थानिक आश्रमापासून या मिरवणुकीला आरंभ झाला. मार्गात साधू-संतांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. श्री पंच दशनम आवाहन आखाडा हा सर्वांत जुना आखाडा असून या आखाड्याच्या उपस्थितीत प्रयागराजमध्ये आतापर्यंत १२२ महाकुंभ आणि १२३ कुंभपर्व झाले आहेत.