Shivling On Graveyard : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील कब्रस्तानातील शिवलिंगामुळे तणाव
१५ वर्षांपूर्वीही शिवलिंगावरून झाला होता वाद
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील कब्रस्तानातील शिवलिंगावरून झालेल्या वादामुळे जौनपूर नगर कोतवाली भागातील मुल्ला टोला येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या काळात दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. ‘असा वाद १५ वर्षांपूर्वीही झाला होता, जो परस्पर सामंजस्याने सोडवण्यात आला होता’, असे लोकांनी सांगितले.
१. मुल्ला टोला येथील रहिवासी राधेश्याम यांनी सांगितले की, पिंपळाच्या झाडातून निघालेल्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालण्यावरून येथे वाद झाला. तेव्हापासून येथे कायमस्वरूपी कुंपण केले जात नाही.
२. अब्दुल कलाम यांनी सांगितले की, शाही ईदगाहचे इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) मौलाना (इस्लामचा अभ्यासक) जफर अहमद सिद्दीकी यांच्यासमोर हा करार करण्यात आला होता. ज्यामध्ये शिवलिंगाच्या हद्दीवरून वाद झाला होता. ‘याठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम केले जाणार नाही’, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ज्याला जल अर्पण करून पूजा करायची असेल, तो करू शकतो, कोणत्याही प्रकारची मनाई नाही. तो आहे त्याच स्थितीत राहील.
३. २ दिवसांपूर्वी शिवलिंगाची तोडफोड झाल्याचा आरोप करत हिंदूंनी पुन्हा एकदा बांधकाम करण्याची मागणी केली. यानंतर प्रकरण आणखी वाढले. त्यादृष्टीने या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
४. येथील पोलीस अधिकारी मिथिलेश मिश्रा यांनी सांगितले की, मुल्ला टोला येथील शिवलिंगाच्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाकब्रस्तानात शिवलिंग आहे, याचा अर्थ ही भूमी हिंदूंचीच असणार आणि त्यावर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे कब्रस्तान निर्माण केले असणार, हे स्पष्ट होते ! |